LOKSANDESH NEWS
पाकिस्तानवर थेट हल्ला करुन पाकिस्तान नेस्तनाबूत करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी
जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील नागरिकांमधून पाकिस्तान विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सर्वत्र पाकिस्तान विरोधात आंदोलने केली जात आहेत. यातच कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आलाय. कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारासमोर तावडे हॉटेल चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आलंय.
यावेळी पाकिस्तानचा झेंडा असलेला बॅनर शिवसैनिकांनी जाळला. तर पाकिस्तान जला दो.. वंदे मातरम्.. भारत माता की जय.. अशा जोरदार घोषणाबाजी करुन शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली