LOKSANDESH NEWS
कौठा येथे स्थलांतरित झालेल्या बसस्थानकावर सोयसुविधा नसल्याने प्रवाशी त्रस्त
नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक कालपासून पुढील एक महिना कौठा येथील मोदी ग्राउंडवर हलवण्यात आले आहे. शहरातील बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
मात्र स्थलांतरित करण्यात आलेल्या या बसस्थानकावर पिण्यासाठी पाणी, बसण्यासाठी खुर्च्या व इतर सोयसुविधा नसल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत. या बसस्थानकावर प्रशासनाने सोयसुविधा पुरव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली