शहरात पाणी बाणी, दहा ते बारा दिवसापासून पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शहरात पाणी बाणी, दहा ते बारा दिवसापासून पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय

LOKSANDESH  NEWS 



शहरात पाणी बाणी, दहा ते बारा दिवसापासून पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय



छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये सध्या पाणीबाणीचा प्रश्न उपस्थित झाला आहे, जुन्या शहराला गेल्या दहा ते बारा दिवसापासून पाणी मिळत नसल्यामुळे, नागरिकांची गैरसोय होत आहे. 

पैठण येथील जायकवाडी धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन ही सतत फुटत असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. जुन्या शहरात गुलमंडी, पान दरिबा, मछली खडक, दिवाण देवडी, कुंभारवाडा, नारळी बाग या परिसरामध्ये पाण्याचा ठणठणात जाणवत आहे. यामुळे सर्व रहिवासी त्रस्त झाले आहेत.

 


लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढून नागरिकांच्या समस्या सोडाव्या अशी मागणी केली जात आहे. या भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते लछु पैलवान हे स्वतः आपल्या टँकरद्वारे गल्लीबोळात टँकर नेऊन घरोघरी पाणीपुरवठा करत आहेत. यामुळे कुठेतरी नागरिकांना थोडासा दिलासा तरी मिळत असल्याचे सांगितले.




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली