LOKSANDESH NEWS
केंद्र सरकारने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत महात्मा बसवेश्वर जयंती शासकीय जयंती म्हणून साजरी करावी - मनोहर धोंडे
जगत ज्योती क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची ८९४ वी जयंती येत्या ३० एप्रिल रोजी असून, त्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे शिवा संघटनेची बैठक पार पडली.
यावेळी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची व विविध खासदार महोदय यांची भेट घेतली. यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की राज्यामध्ये महात्मा बसवेश्वर जयंती ही शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यात येते
त्याच पार्श्वभूमीवरती काश्मीर ते कन्याकुमारी इथपर्यंत केंद्र सरकारने महात्मा बसवेश्वर जयंती हे शासकीय जयंती म्हणून साजरी करावी, अशी आमची मागणी आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, अन्यथा दिल्ली येथे जंतर मंतर वरती शिवा संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.