LOKSANDESH NEWS
भरवीर येथील शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतीला आग लागल्याने शेतकऱ्याचे नुकसान
चांदवड तालुक्यातील भरवीर ते चिंचोले शिवारातील भरवीर येथील शेतकरी सुभाष गणपत जाधव शेत गट नंबर 18 हे असून या शेतकऱ्यांनी उन्हाळी मक्का हाइड्रोलिक कंपनी 51 06 या क्वालिटीची मका पिकाची आपल्या शेतात लागवड केली.
पाण्याची टंचाई असताना देखील त्यानी दोन टँकर पाणी देते पिकांना लहानाच मोठं केलं. काढणीला पिक आलं होतं मात्र या शेताला अचानक आग लागल्यामुळे मका जळून संपूर्ण खाक झाला आहे, या मक्याला सरासरी पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च लागला होता.
काढणीनंतर उत्पन्न 55 ते 60 हजार मिळाले असते. परंतु अचानकपणे आग लागल्यामुळे नुकसान झाले आहे आगीचे कारण अस्पष्ट असून शेतकऱ्यांने मदतीची मागणी सरकारकडे केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली