डोंबिवलीत आभाराच्या बॅनरवरून शिंदे-ठाकरे गटात जोरदार राजकीय वाद उफाळला
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित आणल्याबद्दल डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे बॅनर झळकले आहेत. मात्र या बॅनरबाजीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार वाद उफाळला आहे. ठाकरे गटाने बॅनरबाजीवर टीका केली असून, शिंदे गटाने कामाच्या माध्यमातून उत्तर देण्याचे सांगितले आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्यात आले. या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे आणि शिंदे टीमच्या कार्याचे कौतुक करणारे बॅनर डोंबिवली शहरात झळकले. बॅनरवर एकनाथ शिंदे यांचे काश्मीरमध्ये प्रवाशांशी संवाद साधतानाचे फोटोही झळकत असून, त्यांच्या तत्काळ प्रतिसादाचे कौतुक करण्यात आले आहे.
मात्र, या बॅनरबाजीवरून डोंबिवलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. डोंबिवलीत नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, आणि त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दुःखाच्या प्रसंगी बॅनर लावणे ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे.
काही लोकांना कुठे राजकारण करायच हेच कळत नाही. अजूनही अडकलेल्या पर्यटकांना विमानाच्या महागड्या तिकीटामुळे परतता येत नाही, तरीही मदतीचे खोटे दावे केले जात आहेत. जर काम केलं असेल, तर ते कर्तव्य म्हणून करा, दिखावा करू नका, अशी टीका दीपेश म्हत्रे यांनी या बॅनर वरून शिंदे गटावर केली आहे. तर ठाकरे गटाच्या या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एकनाथ शिंदे आणि आम्ही लोकसेवेला प्राधान्य देतो.
कोण काय बोलतो याकडे लक्ष न देत आम्ही कामाच्या माध्यमातूनच उत्तर देतो, अस प्रत्युत्तर देत म्हात्रे यांच्या टीकेवर बोलणं टाळलं मात्र या बॅनरबाजीनंतर शिंदे आणि ठाकरे गटात कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुपली असल्याचे डोंबिवलीत पहायला मिळत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली