LOKSANDESH NEWS
भिवंडीत अखिल पद्मशाली समाजाच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीस उच्च न्यायालयाची स्थगिती
भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील विणकर समाज अर्थातच पद्मशाली समाज मोठ्या संख्येने राहत आहे.
या समाजाची भिवंडी शहरातील पद्मशाली समाजाची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल पद्मशाली समाजाच्या त्रैवार्षिक कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीस समाज बांधवांनी विरोध करीत उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने विद्यमान कार्यकारी मंडळाच्या घाईघाईत निवडणूक उरकून घेण्याचे मनसुबे उधळून लावत संपूर्ण निवडणूक कार्यक्रमास स्थगिती दिली आहे अशी माहिती अँड एस पी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली