LOKSANDESH NEWS
कल्याणमध्ये याज्ञवल्क्य पुरस्कार वितरण समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती
कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या याज्ञवल्क्य पुरस्कार वितरण समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी आपल्या भाषणादरम्यान त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरआणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत एक प्रसंग सांगताना आशिष शेलार यांनी अजय-अतुल यांचं प्रसिद्ध गीत "लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा" याची आठवण करून दिली. मात्र, “या गाण्यात मशाल हा शब्द असल्याने त्यांनी या गाण्याचं पहिलं कडवं बोलणं टाळलं “या गाण्यात मशाल हा शब्द आहे,
त्यामुळे मी पहिलं कडवं बोलणार नाही” असं सांगत त्यांनी ते टाळलं आणि गाण्याचं दुसरं कडवं उच्चारत उपस्थित मान्यवरांची स्तुती केली. त्यांच्या या विनोदी आणि सांकेतिक शैलीने उपस्थितांमध्ये हास्याचं वातावरण निर्माण झालं. तसेच ठाकरे गटाची निशाणी मशाल असल्याने शेलार यांनी अर्जुन कडवं न बोलण्याची चर्चा देखील सर्वत्र सुरू झाली हा सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना याज्ञवल्क्य संस्थेच्यावतीने सन्मानित करण्यात आलं.
यामध्ये माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, "ठाणे वैभव"चे संपादक मिलिंद बल्लाळ, कार्यकारी विश्वस्त डॉ. सुरेश एकलहरे आणि समाजसेविका विद्याताई धारप यांचा समावेश होता.या पुरस्कारांचे वितरण डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नरेंद्र पवार, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीकांत बोजेवार, तसेच संस्थेचे विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते."धर्मो रक्षति रक्षितः" आणि "तमसो मा ज्योतिर्गमय" या ब्रीदवाक्यांनी सजलेल्या या समारंभात संस्कृती, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात आला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली