LOKSANDESH NEWS
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या वक्तव्यावरुन शिवसेना आक्रमक
दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषीमंत्री कोकाटे यांनी नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी कर्जमाफीच्या मुद्यांवरुन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता?
शेतीमध्ये गुंतवणूक करता का? की साखर पुडा आणि लग्न करता असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता. आता याच विधान वरून ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
आज धुळे शहरातील जुनी महानगरपालिकेजवळ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करीत माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना धुळे जिल्ह्यात फिरू देणार नाही असा पावित्र आता ठाकरे गटाने घेतला आहे.
वारंवार कृषिमंत्री असणारे माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांची थट्टा करीत असतात, जबाबदार पदावर असताना देखील त्यांना आपल्या पदाचे भान राहत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपल्या मंत्र्यांना आवर घालावा असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली