पोलिस अधिकारी सांगून तरुणीसोबत लग्न ठरवलं, त्याच तरुणीनं भामट्याला पकडून दिले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पोलिस अधिकारी सांगून तरुणीसोबत लग्न ठरवलं, त्याच तरुणीनं भामट्याला पकडून दिले

LOKSANDESH NEWS 


                      

           पोलिस अधिकारी सांगून तरुणीसोबत लग्न ठरवलं, त्याच तरुणीनं भामट्याला पकडून दिले



 कल्याण कोर्टात ड्यूटी तर कधी कुलाबा क्राईम ब्रांचमध्ये ड्यूटी, स्वत:ला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत एका तरुणीला इंम्प्रेस केले. दोघांचे लग्न ठरले. मात्र, दररोज काही ना काही कारणं सांगून पैसे आणि दागिन्यांची मागणी केल्यामुळे तरुणीला त्याच्या विषयी शंका आली. अखेर तरुणीने भामट्या पोलिस अधिकाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. निलेश चव्हाण असे या भामट्या पोलिसाचे नाव आहे. त्याने आत्तापर्यंत अन्य किती तरुणींसोबत असा प्रकार केला आहे याचा तपास पोलिस करीत आहेत. 

       कल्याणमध्ये एका कन्सल्टींग कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची निलेश चव्हाण या तरुणासोबत ओळख झाली. निलेश चव्हाण याने स्वत:ला सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे सांगितले होते. आधी सांगितले की, माझी ड्यूटी कल्याण कोर्टात आहे. नंतर सांगितले की, मी कुलाबा क्राईम ब्रांचला पोलिस अधिकारी आहे. फोनवरुन बोलणे करुन निलेश याने तरुणीकडून काही दिवस पैसेही घेतले. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले. मात्र, एका दिवशी निलेश याने लग्नाच्या साखर पुड्याकरीता अंगठी हवी आहे असे सांगत तरुणीकडून महागडी अंगठी घेतली. अंगठी घेतल्यावर तरुणीला शंका आली.

 तिने ही सगळी बाब तिच्या कार्यालयात काम करणारा मित्र किशोर पात्रा याला सांगितली. किशोर याने निलेश चव्हाण याच्याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली. निलेश चव्हाण नावाचा असा कोणताही पोलिस कुठेही कामाला नाही. ही माहिती समोर आली. तरुणीने याची माहिती पोलिसांना दिली. २५ दिवस निलेश तरुणीच्या संपर्कात नव्हता. शुक्रवारी तरुणीला त्याचा फोन आला. लगेच तरुणीने त्याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली. 

तरुणीने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. तोपर्यंत पोलिस त्याच्याजवळ पोहचले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. निलेश याने सातारा येथे राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, तो ठाण्यात राहत होता. निलेशच्या अटकेनंतर पुढील तपास सुरु केला आहे. त्याने अन्य किती तरुणींनी अशा प्रकारे गंडा घातला आहे याचा तपास पोलिस करीत आहेत. 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली