भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आली भव्य वरघोडा मिरवणूक
भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवा निमित्त जैन समाजातर्फे आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात आज सकाळी शहरातील अग्रवाल भवन येथे नाम जप करण्यात आले. त्यानंतर धुळे शहरातून दुपारच्या सुमारास भव्य वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या मिरवणुकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
आज दुपारच्या सुमारास तार गल्लीतील जैन स्थानकापासून वरघोडा मिरवणुकीला सुरवात झाली. येथून ही मिरवणुक आग्रारोड मार्गे जुने धुळ्यातील जैन स्थानक आणि तेथून सुभाष चौक मार्गे, सुस्वप्न नगरी, अग्रवाल विश्राम भवन येथे आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. पांझरा नदीकिनारी असलेल्या अग्रवाल विश्राम भवनात सकल जैन श्री संघातर्फे सुस्वप्न नगरी उभारण्यात आली असून, या ठिकाणी आज दिवसभर विविध कार्यक्रम होत असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली