LOKSANDESH NEWS
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पहाटेपासूनच जळगाव रेल्वे स्थानकाबाहेरील त्यांच्या पुतळ्याजवळ भीमसैनिकांचा प्रचंड जनसागर उसळला होता.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी परिसर अगदी घोषणांनी दणाणून टाकला. यावेळी बहुजन वॉलेंटियर फोर्सच्या वतीने डॉ. आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थित हजारो अनुयायांनी सामूहिक बुद्ध वंदना सादर केली.
या अभिवादन सोहळ्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली