LOKSANDESH NEWS
छावा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणामध्ये उतरून आंदोलन.
शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी छावा संघटना व शेतकरी संघटनेकडून सकाळी १० वाजता जलसमाधी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी मन्याड धरणात उतरत हे आंदोलन सुरू केलेले आहे. जो पर्यंत कर्जमाफी मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील.
असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यावेळी शिऊर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बलभीम गोरे, हेड कॉन्स्टेबल भिल्ल यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र यावेळी प्रशासनाकडून दुपारी ३ वाजे पर्यंत एकही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही. यावेळी जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही,
तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा छावा संघटनेचे किशोर मगर यांनीं दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली