चोपडा तालुक्यातील केळींना परदेशासह उत्तर भारतात मागणी, केळीचा भाव स्थिर असल्याने शेतकरी समाधानी
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर हा पट्टा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्ह्यातील या पट्ट्यातील केळी उत्पादक शेतकरी एक्सपोर्टसाठी जाणाऱ्या केळीच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर निघा राखत असतात. एक्स्पोर्ट क्वालिटी केळीही प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जात असतात. त्याचबरोबर उत्तर भारतात देखील केळीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
चोपडा येथील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून उत्तर भारतात केळी विक्रीसाठी जात असते. सध्या केळीचा भाव पंधराशे असल्याने स्थिर आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी लागलेला खर्च काढून काहीतरी उत्पन्न हाती येणार असल्याने समाधानी आहे.
केळीचा भाव कमी राहिल्याने, शेतकऱ्यांना परवडत नसतो. परंतु सध्या केळीच्या भाव स्थिर असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली जाते. व तालुक्यातून केळी परदेशात व उत्तर भारतात जात असते असे केळी उत्पादक शेतकरी यांनी सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली