तिरंगा रॅली काढत भाजपने भारतीय सैन्य प्रति व्यक्त केली कृतज्ञता, तब्बल 1 हजार 111 फूट भारतीय ध्वजाने वेधले लक्ष
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने धुळे शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील अग्रसेन महाराज पुतळा येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या तिरंगा रॅलीत धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच विविध शाळा महाविद्यालयांची विद्यार्थी देखील या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या 26 भारतीय नागरिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच भारतीय सैन्याने पाकिस्तानला दिलेल्या चूक उत्तरानंतर सैन्य दलाचे मनोबल वाढावे तसेच भारतीय सैन्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात यावी यासाठी या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. होते तब्बल 1हजार 111 फूट असलेला भारतीय तिरंगा या रॅलीत धुळेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.