कल्याण पश्चिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन; ‘फेसलेस’ सेवांमुळे १७ लाख नागरिकांना मिळणार दिलासा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कल्याण पश्चिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन; ‘फेसलेस’ सेवांमुळे १७ लाख नागरिकांना मिळणार दिलासा

LOKSANDESH  NEWS 




 कल्याण पश्चिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन; ‘फेसलेस’ सेवांमुळे १७ लाख नागरिकांना मिळणार दिलासा



 कल्याण पश्चिम येथे नव्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या प्रगत व सुविधायुक्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर तसेच वरिष्ठ आरटीओ अधिकारी उपस्थित होते.या नव्या ठिकाणी प्रशस्त जागा, स्वतंत्र कर्मचारी कक्ष, अभ्यास व प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा, तसेच लहान मुलांसाठी ट्रॅफिक पार्कची सोय करण्यात आली आहे. या पार्कमधून मुलांना अपघात प्रतिबंधक नियमांची माहिती मिळणार आहे.आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरटीओच्या एकूण ५६ सेवा आहेत. या सेवांसाठी पूर्वी हजारो नागरिक दररोज कार्यालयात येत असत. मात्र, मुख्यमंत्री 

यांच्या १०० दिवसांच्या फेसलेस सेवा अभियानात यातील दोन महत्त्वाच्या सेवा पूर्णतः ऑनलाइन करण्यात आल्या.पहिली सेवा म्हणजे व्यावसायिक वाहनांचे रजिस्ट्रेशन. याआधी सुमारे ७ ते ७.५ लाख वाहनधारकांना आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष यावे लागत होते. आता ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन झाल्यामुळे त्यांना कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही.तर दुसरी सेवा म्हणजे वाहन कर्जाच्या नोंदी संबंधित प्रक्रिया. याआधी सुमारे ८ ते ९ लाख नागरिकांना वाहनावरील कर्जाचा बोध किंवा कर्ज समाप्तीच्या नोंदीसाठी कार्यालयात यावे लागत होते. मात्र, आता बँकांसोबत समन्वय साधून ही सेवा देखील ऑनलाइन करण्यात आली आहे.या दोन्ही सेवा फेसलेस झाल्यामुळे दरवर्षी सुमारे १६ ते १७ लाख नागरिकांना प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात यावे लागत होते आता त्यांना या ठिकाणी यावे लागणार नाही . यामुळे केवळ ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच नागरिकांना आरटीओमध्ये येण्याची गरज भासेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.हे नवीन आरटीओ कार्यालय केवळ नागरी सुविधा नव्हे, तर डिजिटल भारताच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. या कार्यालयाच्या माध्यमातून कल्याणमधील नागरीकांना दर्जेदार, जलद व पारदर्शक सेवा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली