LOKSANDESH NEWS
भंडाऱ्यात 'सीडबॉल महोत्सव', पर्यावरण संवर्धनासाठी 1 लाख सीडबॉल्स
बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी व श्री रविशंकर यांच्या जन्मदिनी, १२ मे रोजी 'आर्ट ऑफ लिविंग' भंडारा शाखेतर्फ 'सीडबॉल महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. खामतलाव परिसरात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या उपक्रमात १ लाख सिडबॉल (बीजगोल्या) वितरित करण्यात येणार आहेत.
निसर्गप्रेमी शिक्षिका रजनी सोनकुसरे यांनी प्रेस कॉम्प्रेस मध्ये सांगितले की, माती, शेण व स्थानिक बियांपासून बनवलेल्या या शिडबॉल्सना जंगल, डोंगरदऱ्या, नदीकाठ अशा मोकळ्या जागांवर टाकले जाणार आहे. पावसामुळे या बियांना अंकुर येतो आणि कोणत्याही देखरेखीशिवाय झाडे उगवतात. 'आजचा माणूस तणावग्रस्त जीवन जगतो. निसर्गाच्या सहवासात राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकते,' असे सांगून सोनकुसरे यांनी बीजसंस्काराचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाचा हेतू केवळ वृक्षारोपण नसून संपूर्ण पर्यावरणीय साखळी बळकट करणे आहे. झाडांमुळे वन्यप्राण्याना अन्न मिळाले तर ते गावांकडे येणार नाहीत, यामुळे शेतीचे नुकसानही टळेल.