स्मार्ट मीटरच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन
राज्य शासनाकडून वीज चोरी रोखण्यासाठी काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर हे बसवण्यात येत आहेत. मात्र, या स्मार्ट मीटरचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्रपणे विरोध करण्यात येतोय. स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरण कडून सर्वसामान्यांची ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे.
ग्राहकांला कोणतीही पूर्व सूचना न देता थेट महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवल्या जात असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे. सरकारने हे सगळं त्वरित थांबवावं, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली