शेकडो अतिक्रमणधारकांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री ठिय्या आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शेकडो अतिक्रमणधारकांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री ठिय्या आंदोलन

           शेकडो अतिक्रमणधारकांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री ठिय्या आंदोलन

 बुलढाणा तालुक्यातील मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव येथील वनविभागाने 750 हेक्टरवरील अतिक्रमण हटविल्याने जवळपास शंभर ते सव्वाशे अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत घरातील सर्व साहित्य आणून रात्री 9 वाजता उघड्यावर संसार मांडला आहे. 

त्यामुळे यंत्रणेची धांदल उडाली मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव येथील वनविभागाने 750 हेक्टरवरील वनजमिनीवर 30 ते 35 वर्षापासून ग्रामस्थ राहत होते. आता मात्र वनविभागाने ग्रामस्थांच्या राहत्या जागेवरील अतिक्रमण हटविले आहे.त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यामुळे वैतागलेल्या शंभाराहून अधिक ग्रामस्थांनी चक्क येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरातील सर्व साहित्य घेऊन उघड्यावरच संसार मांडला आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली