गुरुकुल शिक्षण संस्था संचलित, ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2024 - 25 चा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलेला असून ही परंपरा सलग तीन वर्ष चालू आहे.
तसेच शाळेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक मा. श्री मोहन वनखंडे सर आणि संस्थेच्या सचिव सौ. अनिता वनखंडे मॅडम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक व समन्वयक श्री. संतोष जाधव
सर तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेत प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी.
१) कु. आयुर्षा अशोक म्हैसकर - 93.40% प्रथम क्रमांक
२) कु.सुबहान वसिम मकानदार - 92% द्वितीय क्रमांक.
३) कु. स्वयंम शितलकुमार हवालदार - 90.40% तृतीय क्रमांक
या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक तसेच संस्थेचे अभिनंदन...💐💐
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली