गोंदिया-तिरोडा नगरपरिषदेत निवडणुकीची जोरदार तयारी; काँग्रेसची संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू
येत्या काही महिन्यांत गोंदिया व तिरोडा नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाच्या दिलीप बनसोड जिल्हाध्यक्षांनी सांगितले की, निवडणूक लक्षात घेता काँग्रेसने प्रत्येक वार्डात, प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन लोकांशी थेट चर्चा सुरू केली आहे.
संघटन बळकट करण्यावर भर देण्यात येत असून, लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काम केले जात आहे. युतीबाबत विचारले असता, जिल्हाध्यक्ष म्हणाले की, युतीवर अद्याप कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य राहील. मात्र, काँग्रेस हा मोठा पक्ष असून, प्रत्येक निवडणुकीत आपला उमेदवार देत असतो आणि याही निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणाले की, त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे. यावर काँग्रेसने युतीचा मुद्दा सध्या गौप्य ठेवत, जनतेच्या प्रश्नांवर काम करणे हाच पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली