गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आतापर्यंत 230 घराचे नुकसान, एक व्यक्ती आणि दोन जनावरे सुद्धा दगावली
गोंदिया जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये 230 घरे यांचे अक्षरश: नुकसान झाले असून 1 घराचे पणे नुकसान झालेले आहे. तसेच 74 जनावरांच्या गोठ्याच नुकसान झालं आहे.
तर वीज पडून 1 व्यक्ती दगावला असून 2 जनावरे सुद्धा दगावली आहेत. एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये 22 घर, 1 व्यक्तीच्या मृत्यू आणि 13 गोठ्यांचे नुकसान झाले. तर मे महिन्यात 208 घर, 61 गोठे, 2 जनांवरांचा मृत्यू झालेला आहे. शासनाकडून मृत व्यक्तीचे आणि 2 दगावलेल्या जनावरांचे अनुदान प्राप्त झाले असून हे अनुदान तहसीलदार मार्फत संबंधित व्यक्तीला वितरित करण्यात आले आहे.
परंतु अद्यापही 230 घरे आणि 74 गोठे यांच्या अनुदान बाबत यांच्या प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर अनुदान प्राप्त होताच संबंधित नागरिकांना याचा आर्थिक मदत दिली जाईल असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली