वणी येथील निरगुडा नदी पात्रात घरकूल लाभार्थ्यांसाठी वाळू सत्याग्रह आंदोलन
यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये पावणेदोन लाख घरकुल विविध योजनेतून मंजूर करण्यात आले. वणी तालुक्यामध्ये दहा हजार घरकुल मंजूर झाले. आहे. त्यापैकी अनेक घरकुलधारकांना रेती चढ्यादराने विकत घ्यावी लागते. घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही.
परिणामी अनेक गरजू घरकूल लाभार्थ्यांचे घरबांधकाम अर्ध्यावर थांबले आहे. पावसाळ्यात अनेकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी वणीच्या निरगुडा नदी पात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली