पैश्याच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण, पोलीसांनी 24 तासात 3 अपहरणकर्त्यांना अटक करत व्यापाऱ्याची केली सुटका
पैश्याच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरणं करुन त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना 24 तासात अटक करुन व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आलेय. तिर्भे सेक्टर 20 येथील व्यापारी पंकेश पाटील आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीने जात असताना पांढऱ्या रंगाचे गाडी मधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पंकेश याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवत त्याला जबरदस्ती गाडीत बसवून त्याचे अपहरण केले.
याप्रकरणी सहकार्याने तात्काळ एपीएमसी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. नवी मुंबई पोलीसांनी एकूण 10 पथक तयार करुन अपहरणकर्त्यांचा शोध सुरु केला होता. अपहरणकर्ते व्यापाऱ्याला वाशीम येथे घेऊन गेले होते. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी तीनही आरोपीना वाशीम येथून ताब्यात घेत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केलेय.