LOKSANDESH NEWS
| विजांच्या कडकडाटासह सकाळपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह रत्नागिरीतील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जिल्ह्याला दिला आहे. आज विजांच्या कडकडाटा बरोबरच सकाळपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यामध्ये सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली.
तालुक्यातील दहागाव, घराडी, शेडवई ,आवाशी, पालवणी गावाला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेले नागरिक यामुळे सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे.