मुंबई-नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग, जीवितहानी टळली

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुंबई-नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग, जीवितहानी टळली

LOKSANDESH  NEWS 


                   मुंबई-नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग, जीवितहानी टळली

 मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल (मध्यरात्री) दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते.

कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक येथून अग्निशमन दलाच्या ६ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली