गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

                                                             LOKSANDESH  NEWS 






                        गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असताना नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडल्याच समोर आल आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराती वय 40 यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराती वय 37 यांच्या घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची तक्रार गंगापूर रोड पोलीस स्टेशन येथे नुकतीच दाखल झाली असून भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी असून आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. मृत भक्ती अथर्व गुजराती यांना पाच वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांना फरार भक्तीचे पती अथर्व गुजराती यास लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./