LOKSANDESH NEWS
चोपडा तालुक्यातील 38 हजार 400 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके- मिलिंद पाटील
चोपडा तालुक्यात सन 23 -24 च्या पटसंख्येनुसार सन 2025 -26 च्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप केली जाणार असुन तालुक्यातील एकूण 38 हजार 481 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पुस्तके दिली जाणार आहे.
या वर्षापासून एकात्मिक पुस्तके बंद झाल्याने विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे स्वतंत्र पुस्तक मिळणार असल्याने त्यांच्या पाटीवरचं ओझ पुन्हा वाढणार आहे, विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यासाठी दोन गाड्या पुस्तके प्राप्त झाली आहेत. गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तके वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक मिलिंद पाटील यांनी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./