गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश, माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश, माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप

गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश, माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप 

धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या रोकड रकमेचे प्रकरण दडपून टाकण्याच्या उद्योगाकडे पोलिसांची वेगाने वाटचाल चालू झाली असून आतापर्यंत गुन्हा रजिस्टर न करता तपासाच्या नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला आहे सदर प्रकरण दडपून टाकण्याची गृह खात्याचे गुप्त आदेश असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचा बळीचा बकरा करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप देखील अनिल गोटे यांनी केला आहे.

तसेच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आपल्यावर खंडणीचा आरोप केला असून याप्रकरणी आपण धुळे न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./