मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर पोलिसांनी दाटीवाटीने कोंबलेल्या म्हशींनी भरलेले 4 ट्रक पकडले, सात आरोपींना अटक
खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रक अडवून पाहणी केली असता सदर वाहनात दाटी वाटीने कोंबलेल्या अवस्थेतील म्हशी आढळून आल्या. एकूण ४ ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले असून 80 जनावरे देखील ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात खालापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये एकूण सात आरोपी असून ४ ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळेत जमा करण्याचे काम सुरु आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.