प्राथमिक आरोग्य केंद्राला विद्युत पुरवठा नसताना वीज बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महावितरण अधिकाऱ्यांकडून कारवाई
बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे आठ वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली होती. मात्र वीज जोडणी अभावी आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली. इमारतीला कोणताही विद्युत पुरवठा नसताना महावितरण कर्मचाऱ्यांनी 90 हजारांचे बिल दिले. याची गंभीर दखल घेत महावितरण विभागाने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती मागवली. ज्यात प्राथमिक आरोग्य केंद्राला विद्युत पुरवठा नसताना देखील विज बिल दिल्याच समोर आले. याची चौकशी केली असता 2023 मध्ये वीज जोडणी झाल्याचं दिसून आले. त्यामुळे त्यावेळेस कार्यरत असणारे इंजिनिअर आणि दोन लाईनमन वर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर निलंबन आणि गुन्हे नोंदविले जाणार आहेत. तसेच मीटरचे रीडिंग घेणाऱ्या एजन्सीवर देखील कारवाई केली जाणार असल्याचं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.