नवी मुंबईमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी 6 पिडीत महिलांची केली सुटका
नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात अलमो स्पा सेंटर मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सदर स्पा सेंटरवर डमी ग्राहक पाठवून धाड टाकली असता स्पा सेंटर मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली 7 हजार रुपये स्वीकारून महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे समोर आले.
नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तात्काळ कारवाई करत 1 स्पा मालक आणि 2 मॅनेजरला अटक केली असून, 6 पीडित महिलांची सुटका देखील केली आहे. तिघा आरोपींविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली