अंजली दमानिया यांच्या वक्तव्याला फारसे महत्व देण्याची गरज नाही - आनंद परांजपे
ON दमानिया
- अंजली दमानिया यांना विनम्रतापूर्वक माझ म्हणणे आहे की, त्यांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर विश्वास नाही, लोकशाही पद्धतीने जनतेने दिलेल्या जनादेश वर विश्वास नाही, न्यायपालिकेवर दिलेल्या निकालावर पण विश्वास नाही अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे
- छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. आज त्यांनी मंत्री मंडळात पुन्हा एकदा शपथ घेतली आहे
- अंजली दमानिया यांच्या वक्तव्याला फारसे महत्व देण्याची गरज नाही
- येवल्याच्या जनतेने भरभरून छगन भुजबळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले
- न्याय पालिकेने महाराष्ट्र सदनात त्यांना क्लीन चिट दिली आहे
- कुठल्याच ह्या तिन्ही संस्थांवर विश्वास नसल्यामुळे अंजली दमानिया अशाप्रकारची प्रतिक्रिया देत असतात
ON भुजबळ पालकमंत्री नाशिक
- पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की, त्या त्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री असावं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल
ON जल्लोष शरद पवार गट ओबीसी सेल
- याबाबतची स्पष्ट भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे की कोणत्याही प्रकारची राष्ट्रवादी एकत्रित येण्याची शक्यता नाही
- शेवटी भारतभर आणि राज्यभर ओबीसीच्या हक्कासाठी लढणारा नेते म्हणून छगन भुजबळ यांची प्रतिमा आहे
- त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने जल्लोष होणे ही क्रमप्राप्त आहे
ON मनोज जरांगे पाटील
- जरांगे पाटील जे आरोप करतायेत ते निराधार आहेत
- कोणत्याही प्रकारे मराठा समाजावर अन्याय होणार नाही हीच भूमिका महायुती सरकारची नेहमी राहिलेली आहे
ON स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
- राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून एक मोठा वाटा छगन भुजबळ यांचा आहे
- मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर एक जल्लोष सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे
- स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महाराष्ट्रभर ते फिरतील आणि याचा फायदा महायुतीला होईल
ON खाते
- कोणतं खात जायचं याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली