चार लाख 61 हजाराचा अवैध खत साठा जप्त,कृषी विभागाची धडक कारवाई

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चार लाख 61 हजाराचा अवैध खत साठा जप्त,कृषी विभागाची धडक कारवाई


                      चार लाख 61 हजाराचा अवैध खत साठा जप्त,कृषी विभागाची धडक कारवाई

-सहसंचालक लातूर विभाग लातूर  साहेबराव दिवेकर  व  मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख  यांचे मार्गदर्शनाखाली  व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  रवींद्र माने , कृषी विकास अधिकारी  प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेड मध्ये विनापरवाना एकूण 456 पोते रासायनिक खत (वजन 20मे. टन) निदर्शनास आल्यामुळे आज पोलीस ठाणे वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यात आला. आणि एकूण 4.61 लक्ष रुपये किमतीचा रासायनिक खत साठा जप्त करण्यात आला.

  सदरील गुन्ह्याची फिर्याद राजाराम बर्वे, तालुका कृषी अधिकारी वाशी यांनी दिली. सोबत मोहीम अधिकारी डी.ए. गरगडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धाराशिव प्रवीण पाटील,  पंचायत समिती वाशी कार्यालयाचे कृषी अधिकारी अविनाश माळी, विस्तार अधिकारी कृषि श्रीकांत साळवे, तालुका कृषी अधिकारी वाशी कार्यालयातील श्री गायकवाड, श्री साखरे हे होते. 




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली