भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीने तिरंगा सन्मान पदयात्रा
भारतीय सैनिकांच्या समानार्थ राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीने तिरंगा सन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मार्कंडेय उद्यान येथील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, ही पदयात्रा सुरू झाली.पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी हे या पदयात्रेत सहभागी झाले होते. मात्र भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी या पदयात्राकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले.
मार्कंडेय उद्यान येथून निघालेली ही पदयात्रा अशोक चौक, सत्तर फूट भाजी मंडई मार्गे माधव नगर येथील पटांगणात समारोप झाला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी अतुलनीय असे शौर्य दाखवले आहे. विजय शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा सन्मान पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली