उलवेतील महिलेच्या खुनाचा झाला उलगडा, पत्नी घटस्फोट देत नसल्याने पतीनेच 6 लाखांची सुपारी देत केली हत्या
उलवे येथे अलविना सिंग या 27 वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात इसमाने गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी महिलेच्या पतीने फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी कुठलाही सुगावा नसताना अतिशय शिताफिने तांत्रिक तपास करुन गुन्ह्यांची उकल केली आहे.
मृत महिलेचा पती किशोर सिंग यानेच पत्नी घटस्फोट देत नाही म्हणून ओळखीतील दोन महिलांशी संगनमत करुन परराज्यातून दोघांना बोलावून त्यांना 6 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नी अलविना सिंग हिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी पती किशोर सिंग, अलिशा त्यागी आणि चरणजित कौर या तिघांना अटक केली असून, दोघे जण फरार आहेत. तीन्ही आरोपींना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./