सर्वात कमी वय असलेल्या 9 वर्षीय सिद्धीने रॅपर डाऊन केला कोकणकडा, साखळी बु.च्या चिमुकल्या सिद्धी ची कमाल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सर्वात कमी वय असलेल्या 9 वर्षीय सिद्धीने रॅपर डाऊन केला कोकणकडा, साखळी बु.च्या चिमुकल्या सिद्धी ची कमाल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

 सर्वात कमी वय असलेल्या 9 वर्षीय सिद्धीने रॅपर डाऊन केला कोकणकडा, साखळी बु.च्या चिमुकल्या सिद्धी ची कमाल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

 महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतील कोकणकडा या धाडसी आणि अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकली सिद्धी विठ्ठल सोनुने हिने यशस्वीरीत्या पेललं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी बुद्रुक इथल्या तिसरीत शिकणाऱ्या सिद्धीने आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलं आहे. यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नववर्षीय सिद्धी ची नोंद घेऊन घ्यावी लागली.

बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील नववर्षीय सिद्धी विठ्ठल सोनुने या चिमुकली इयत्ता पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर, आणि यावर्षी २६ जानेवारीला हिमालयातील केदारकंठा 12,500 फूट सर करून तिरंगा फडकवणारी बनली होती. तर सिद्धीने 30 मार्च 2025 रोजी, पहाटे 4.30 वाजता पाचनाई गावातून चढाई सुरू करून, केवळ साडेतीन तासांत हरिश्चंद्रगड व तारामती शिखर पार करत, सुमारे 1800 फूट उंचीचा कोकणकडा रॅपलिंगच्या केला. यानंतर तिने भारताचा राष्ट्रध्वज कोकणकड्यावर फडकवला आणि पुन्हा रॅपलिंगच्या माध्यमातून म्हणजे दोरीच्या सहाय्याने दुपारी 12.30 पर्यंत कोकणकड्यावरून सुरक्षित उतरली..सिद्धीच्या या पराक्रमाने तिचे केवळ गावच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश अभिमानाने उंचावले आहेत. HimOrdile Trek Adventure संस्थेने तिच्या शौर्याला सलाम करत "सह्याद्रीची हिरकणी" अशी उपाधी बहाल केली. तर तिच्या या कामगिरीची नोंद India Record Book मध्ये सन्मानाने झाली आहे.

या नववर्षीय सिद्धीला आता माउंट एवरेस्ट सर करण्याचं सिद्धीचे स्वप्न आहे..तिचे धाडस आजच्या पिढीला प्रेरणा देणारं आहे..बुलडाण्याच्या मातीतील जिजाऊंची ही लेक भविष्यात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार, यात शंका नाही.. तिच्या या यशामुळे कौतुकांचा वर्ष होत आहे.. 


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली