न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेताच वकील संघाने साजरा केला जल्लोष
देशाच्या सर्वोच्च पदी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेताच अमरावती वकील संघाने जल्लोष साजरा केला.यावेळी ढोल ताशे व मोतीचुर चे लाडू वाटत आनंद साजरा केला.
“भूषणने त्याचे वडील रा. सू. गवई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजाभिमुख काम करावं,
भूषणने कोण मोठं, कोण लहान हे न पाहता सर्वांशी समान वागणूक ठेवावी, लोकांच्या हितासाठी काम करावं, अशी त्यांची मनस्वी इच्छा आहे.
“लोकाभिमुख राहून न्याय द्यावा, लोकांच्या हक्कांची जपणूक करावी, हेच मी त्याच्याकडून अपेक्षित ठेवते,” भूषण गवई हे साधेपणाने जगणारे, सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्त्व असून, न्यायव्यवस्थेतील त्यांचा प्रवास ही तर प्रेरणादायी कहाणी आहे.असल्याचे मत यावेळी अमरावती च्या वकिलांनी व्यक्त केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली