सोलापूरच्या विमानसेवेचा मुहूर्त ठरला ; अखेर 9 जूनला सोलापुरातून गोव्यासाठी उडणार विमान
सोलापूरकर आतुरतेने ज्यादिवसाची प्रतीक्षा करीत होते, अखेर तो दिवस जवळ आल्याची माहिती सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केली. येत्या ९ जूनपासून सोलापूर ते गोवा कमर्शियल विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र, ही सेवा उडान योजनेंतर्गत नसणार आहे. त्यामुळे जादा पैसे मोजून सोलापूरकरांना विमानातून प्रवास करावा लागणार आहे. सोलापूरकरांना उडान योनजेचे आश्वासन दिले गेले होते. आता या योजनेचे काय झाले? अशी विचारणा सोलापूरकरांकडून होत आहे.
सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान प्रवासाचे तिकीट दर कमीत कमी ३,४९१ रुपये, तसेच जास्तीत जास्त ५ हजार ६०० रुपये (यात ५ टक्के जीएसटीचा समावेश आहे) इतके असणार आहे.तेच उडान योजनेतंर्गत तिकिटाचे दर दोन ते अडीच हजार रुपये असणार होते. मंगळवार दुपारपासून ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाले असून, तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेकांनी वेबसाइटला भेट दिली. त्यामुळे सायंकाळी फ्लाय ९१ ची वेबसाइट हॅक झाली.