मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

                        Loksandesh news


मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन 

1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाद्वारे जिल्ह्यातील नागरिक व रुग्णांना अधिकाधिक उपयुक्त ठरणार आहे. आज या कक्षाचे उद्घाटन झाले, याचे आम्हाला समाधान असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. यावेळी वनविभागाच्या माध्यमातून बचत गट सक्षमीकरण व सबलीकरणासाठी उभारलेल्या वन कट्ट्याचे उद्घाटन देखील मंत्री आदिती तटकरे यांनी केले. यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली