LOKSANDESH NEWS
गोंदिया जिल्ह्यात रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेला अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, या आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पीक आणि मका पिक हे आता कापणीला आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
त्याच प्रमाणे आंबा पिकाला सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आलेल्या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला आहे. मात्र, आलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली