लाडक्या बहिणीवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर ही राज्य सरकारचे लक्ष नाही - माजी राज्यमंत्री बच्चू कडू
ON पाकिस्तान वार
- नेहमी नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात.
- पाकिस्तानचे नेहमीच दुखणं बंद केलं पाहिजे.
- जसा इंदिरा गांधीजींनी बांगलादेश वेगळा काढला, तसाच पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील, तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहेत.
- प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची अनोखी मागणी.
ON दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
- असं झालं तरी जनतेचं काय भलं होणार आहे.
- राष्ट्रवादी कधी वेगळी होती. पवार साहेब आणि अजित दादा हे वेगळे होते शक्य आहे का. ते एकत्रच होते.
- मीडियासमोर आणि लोकांसमोर नव्हते मात्र ते एकत्रच होते.
- काळ्या मस्जिदचे जुने लोक आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला कागदपत्र दाखवले, त्यातील काही ठिकाणी बेपत्ता लिहिले आहे ते जिवंत आहेत.
- जे लोक मला भेटले ते चुकीचं सांगत आहे, असं मला प्रथमदर्शी वाटत आहे. केस चालू आहे तिथे त्यांनी लढावं.
ON प्रहार आंदोलन
- दोन जूनला आमचा आंदोलन सुरू होईल, आणि 3 जूनला आमची बारामतीत सभा होईल.
- 3 तारखेला पंकजा मुंडे, 4 तारखेला बाळासाहेब पाटील, 5 तारखेला संजय राठोड आंदोलन होणार.
- 7 जूनला राज्याभिषेक दिवशी नागपूरकडे आगे कूच करणार.
- त्या ठिकाणी आमचं मुक्कामी आंदोलन राहील देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर.
- कोरोना काळात ताठ वाजले होते. त्यामुळे ताठ वाजून आंदोलन करणार.
- त्यांनी जे बोलले ते आठवण्यासाठी ताठ वाजवणार आहोत, कारण ते विसरले आहेत.
- बावनकुळे म्हणतात 5 वर्षात आम्ही कधीही कर्जमाफी करू. जनतेला फसवण्याचे काम सरकार करत आहे.
- वेळ पडली तर आम्ही गुन्हे दाखल करून कोर्टात जाऊ.
ON लाडका कार्यकर्ता.
- लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते. पण पंधराशे वरच आहे अजून.
- सरकारला लाडका शब्द हा कडवट होत आहे. लाडक्या बहिणीवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर ही राज्य सरकारचे लक्ष नाही.
- शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारामतीतून आंदोलन करणार.
- मजुरांसाठी स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे.
- बारामतीतून सुरुवात करतोय कारण अर्थ खात बारामतीत आहे. आणि ते म्हणतात अर्थ नाही. आम्ही त्यांना सांगणारा आहोत की, अर्थ कसे निर्माण केले जातात
- आमच्या जवळून घेतलेले पैसे आम्हाला परत जरी केले, तरी आमच्या सर्वांचं कर्ज माफ होऊ शकतं.
- 35 ते 40 हजार कोटी रुपये पाहिजेत कर्जमाफीसाठी यातून शेतकरी आणि दिव्यांगांचे कर्ज माफ होऊ शकतो.
ON प्रहार संघटना
- प्रहार संघटनेची पार्श्वभूमी जाती धर्माची नाही. सामान्य माणसाच्या विचाराची आहे.
- एखाद्या जाती-धर्माचे काम करायचं म्हणलं, तर असंख्य कार्यकर्ते भेटू शकतात मात्र फक्त सेवा आणि सेवा कार्यकर्ता भेटत नाहीत. महाराष्ट्रात आम्ही तो कार्यकर्ता कमावला आहे.
- सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एखादी योजना असली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील किंवा प्रचंड काम केला असेल. त्यासाठी योजना असणे गरजेचे आहेत त्याची सुरुवात आम्ही करत आहोत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.