जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा खंताचा तसेच बियाणांचा तुटवडा पडणार नाही. खरीप हंगामाच्या पूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आदेश. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठक. खरीप हंगामाला सुरवात होत आहे. मेघ गर्जनेसह पाऊसाळा उंबरठ्यावर सज्ज झाला आहे. जिल्हातील खरीप हंगामाची पूर्व तयारी, खतांची उपलब्धता, बियाणांची मागणी, तुटवडा, यासह अनेक महत्वाच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली.
बैठकी मध्ये जिल्हातील सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनाय कुमार राठोड, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, जालन्याचे चे खासदार डॉ कल्याण काळे, पालकमंत्री संजय शिरसाट, राज्यसभेचे सदस्य डॉ भाग्वत कराड, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आबंदास दानवे, महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री अतुलसावे, याच्यासह सर्व यंत्रणा सज्ज होती.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.