वैष्णवी ची आत्महत्या नाही तर ती हत्या आहे - चित्रा वाघ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वैष्णवी ची आत्महत्या नाही तर ती हत्या आहे - चित्रा वाघ


                                                         LOKSANDESH  NEWS 



                                     वैष्णवी ची आत्महत्या नाही तर ती हत्या आहे - चित्रा वाघ


  वैष्णवीची बातमी वाचल्यानंतर मला खूप वेदना झाल्या. वैष्णवीची आत्महत्या नाही तर ती हत्याच आहे, असं म्हणतं चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, पुण्याच्या पोलिसांशी देखील मी बोलले. आणि ही आत्महत्या नाही तर तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं. तिच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा होत्या. एका मुलीला तळ हाताच्या फोडासारखं वाढवतात आणि लग्न करून दिल्यानंतर तिच्यावर थूकतात, तिला मारहाण करतात, तिचे केस उपटतात. हे हायवानाच्या सारखं काम आहे. हगवणे तो कोण पण असू दे, तो कुठल्याही पार्टीचा असू दे, कोणाच्या किती पण जवळचा असू दे, मांडीला मांडी लावून बसणार असू दे, वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलो करू.

   वैष्णवी तिच्या आई-वडिलांची मुलगी नाही तर ती या महाराष्ट्राची मुलगी आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. आज 21 व्या शतकामध्ये देखील हुंड्यासाठी ज्या पद्धतीने मुलीला मारलं जातं, त्यांना मरण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या लेकराचा देखील विचार केला गेला नाही, वैष्णवीला ज्या पद्धतीने टॉर्चर केलं गेलं ते अमानवी आहे. पुणे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा आणि तिच्या कुटुंबीयांना अटक केली आहे. सासरा आणि एक मुलगा फरार आहे. ते देखील पकडले जातील. कोणालाही सोडले जाणार नाही, हे देवेंद्र फडणवीस राज्य आहे. हे महायुतीचं सरकार आहे. कोणी कितीही जवळचा असला तरी देवा भाऊ कोणालाही सोडणार नाहीत. वैष्णवीचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही.

 सोन चांदी, गाडी, मागण्यात आले. वैष्णवीच्या आईने सांगितल्याप्रमाणे पोरीला त्रास होत असेल तात्काळ ॲक्शन घेतली पाहिजे. या हायवांना, राक्षसांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली