ट्रॅव्हल्स मधुन चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरी करणाऱ्या तीन पैकी एका चोरट्याला एलसीबी पथकाने केली अटक
पांढरकवडा हद्दीतील मोहदा परिसरात असलेल्या हिंदुस्थानि धाब्यावर जेवणा करीता थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधुन चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरी झाली होती. या प्रकरणात आरोपी बाहेरील राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले व ७ लाख,६८ हजार ७८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चोरांपैकी एका चोरट्याला अटक केली. मध्यप्रदेश येथून मोला खान रोशन खान, वय ३८ वर्ष, रा. पटेलपुरा लुन्हेरा (बुजुर्ग) ता.मनावर जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश याला ताब्यात घेतले. त्याचे सहकारी आरोपी मुस्ताख ऊर्फ चिलु शमशेर खान व शारुख खान रमजान खान दोन्ही रा. खेरवा जि धार राज्य मध्यप्रदेश यांचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. अशी माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.