महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद



                                        महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद


ON वाळू माफिया

- वाळू माफिया रोखण्यासाठी नवीन वाळू धोरण आम्ही आणला आहे 

- अनेकजनांचे मंत्र्यांशी वगैरे संबंध असतात, वाळू संदर्भात काही जण तर अधिकाऱ्यांना माझं देखील नावं सांगतात

- पण माझा फोन जरी आला, तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा, अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत

- पुढच्या 3 वर्षात वाळू माफिया आणि वाळू संदर्भातले सर्व महत्वाचे प्रश्न संपलेले असतील 

ON भूमिअभिलेख आंदोलन 

- भूमी अभिलेख खात्यातील लोकांना सूचना दिल्यात तातडीने रुजू व्हावे 

- त्यांनी शासनाला कोणताही सूचना न देता संपवार गेले आहेत 

- त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत, त्यांनी ड्युटीवर येऊन सांगावे

- लोकांना वेठीस धरणे हे शासन मान्य करणार नाही 

- आम्ही त्यांची कोणतीही मागणी अशी पूर्ण करणार नाही, त्यांना पगार देखील दिला जाणार नाही

- अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट न सांगता जरं आंदोलन आणि युनियनबाजी करणार असतील, तर हे मान्य नाही 

- तुमचा कुठलाही प्रश्न असेल, तर सरकारपुढे मांडा. मंगळवारी येऊन मला भेटा, पण यापद्धतीने वेठीस धरणे योग्य नाही 

- सरकार तुमचा प्रश्न सोडवायला तयार आहे, कोतवाल पासून तलाठी पर्यंत सर्वांना न्याय दिला पाहिजे 

ON उजनी वाळू 

- उजनी धरणात खोलीकरण करून, त्यातून निघणारी वाळू सरकारी कामना देण्याचा चर्चा झाली 

ON जळगाव प्रसूती

- आबिटकर साहेब हे सक्षम आहेत. या संदर्भात ते योग्य ते कारवाई करत निर्णय घेतील 

ON शरद पवार कौतुक आणि संजय राऊत 

- विरोधी पक्षात कामं करणाऱ्या चांगल्या लोकांचं देखील कौतुक केलं पाहिजे हे संस्कार आहेत 

- शरद पवार यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रमध्ये घालवल, त्यामध्ये चांगलं कामं केलं आहे 

- संजय राऊत संस्कृती आणि संस्कार विसरलेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार

ON लाडकी बहीण आदिवासी निधी 

- अत्यंत फेक बातमी आहे. बातमीत तथ्य नाही.

- काहीतरी व्हॉट्सवर सरकार बद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी चालू आहे. आदिवासी समाज आणि मागासवर्गीय समाज कुठलेही सरकार कधीही या पैशाला हात लावत नाही हा रिझर्व पैसा आहे.

- आदिवासी विभागाची जी टक्केवारी एकदा मंजूर झाली, ती कोणालाही काढण्याची हिम्मत नाही.

- लाडक्या बहिण योजनेच बजेट हे वेगळ आहे, ते महिला व बालकल्याणकडे आहे.

- समाजकल्याणचे पैसे आणि आदिवासी विभागाचे पैसे दुसरीकडे वळवण्यात येत नाही 

- त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्यासाठी तयार केली गेलेली. जाणीवपूर्वक बातमी जी व्हॉट्सॲप फिरत आहे.

ON स्थानिक स्वराज्य निवडणूक 

- निवडणूक घेण्याचा अधिकार हे आयोगाला आहे 

- आयोग जेव्हा निवडणूक घेईल, तेव्हा सरकार म्हणून यंत्रणा तयार आहे 

- भाजप म्हणून देखील आम्ही सक्षमपणे तयार आहोत 

ON राहुल गांधी 

- राहुल गांधी किती वेडे झालेत, हे संपूर्ण देशाला माहिती आहे

- ऑपरेशन सिंदूर सारख्या गोष्टीवर ते प्रश्नचिन्ह उभे करतात 

- महाराष्ट्रमध्ये सावरकर यांचा अपमान त्यांनी केला, त्यावेळी कोर्टाने फटकारलं 

- ते वेडे झालेत, त्यामुळे त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका 

ON स्थानिक स्वराज्य संस्था महायुती 

- महायुतीमध्येचं निवडणुका होतील, पण ज्याठिकाणी जुळणार नाही त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल, त्यानंतर पुन्हा एकत्रित येऊ

- महायुतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असं काही याचा अर्थ नाही 

ON लोकसभा पराभव विश्लेषण 

- भाजप निवडणुकीत आम्ही जिंकतो त्यातून काही शिकतो 

- लोकसभेत काही जागावर आम्ही शिकलो, आणि चार महिन्यात आम्ही विधानसभा निवडणुकीत जिंकलो 

- जिंकणे हरणे या लढाईत न जाता आम्ही राज्यचे जनतेच्या कामाला लागलो आहे

ON फडणवीस अजित पवार शिंदे संवाद

- या सोलापूरच्या विकासासाठी जास्तीत जास्त विचारलं पाहिजे 

- अशा प्रश्नामुळे महायुतीमध्ये कोणताही दगड पडणार नाही, याची काळजी तुम्ही (माध्यम) घ्या, आम्ही देखील घेतो



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.