ट्रम्प काय म्हणतात त्याला अर्थ नाही, लढले ते आमचे सैनिकच- संजय राऊत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ट्रम्प काय म्हणतात त्याला अर्थ नाही, लढले ते आमचे सैनिकच- संजय राऊत

LOKSANDESH  NEWS 




                       ट्रम्प काय म्हणतात त्याला अर्थ नाही, लढले ते आमचे सैनिकच- संजय राऊत 


- भारतीय सैन्यदल हे जगातील सर्वाधिक श्रेष्ठ आहे. पहलगामचा बदला घेतल्याने आमची छाती अभिमानाने फुलली आहे. याचे श्रेय भारतीय सैन्याला जाईल. हा फक्त एक ट्रेलर आहे. 

- हल्ले झाले की नाहीत हे पुरावे मागण्याची गरज नाही. टार्गेट पूर्ण केले आहे.

- हा कुठला राजकीय विषय नाही. पंतप्रधान यांनी हल्ल्याची सर्व जबाबदारी भारतीय सैन्याकडे दिली होती

- २६ भगिनींत कुंकू पुसले गेले. या बहिणींचा बदला घेतला गेला.आपल्या परंपरेत सिंदूरला महत्व आहे

- नैतिक वगैरे सपोर्ट करत राहील अमेरिका, पण लढले ते आमचे सैनिकच. ट्रम्प काय म्हणतात त्याला अर्थ नाही

- देशाचा दबाव होता बदला घेण्यासाठी. पहलागाम हल्ला हा भारतीय सैन्याला चॅलेंज होते

- पंतप्रधान कधी मॉनेटरी नाही करत. सैन्यावर सर्व जबाबदारी दिली होती. राजकारण होवू नये. पुलवामा वरून राजकारण झाले होते. राजकीय श्रेय घेत असाल तर जे हल्ल्यात मृत झालेत त्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न असेल. जे बोलत होते ते सीमेवर बंदूक घेवून उभे नव्हते

- मोदींनी अगोदर अमित शहांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तर ते करून दाखवले असं म्हणायला वाव होता.

- युद्ध सरावाची गरज नाही भारतीय जनतेला. अनेक युद्धं भारतीयांनी पाहिली आहेत. हल्ला झाला की कशी तयारी असावी याचा हा सराव आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली