अवकाळी पावसाचा आंबा व्यापाराला मोठा फटका; दरात मोठी घसरण
सततच्या बदलत्या वातावरणाचा भाजीपाल्यावर, फळांवर बराच परिणाम होत असतो. सध्याच्या अवकाळी पावसामुळे राज्यभरात आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात आलेले आंबे सडत आहेत. तसेच पाऊस पडल्यानंतर माणसांची आंबे खाण्याची मानसिकता सुद्धा कमी होते, त्यामुळे आंब्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
तब्बल १०० ते १५० रुपयांनी आंब्यांचे दर घसरले आहेत. ७०० ते ६५० रुपये डझनने मिळणारे आंबे आता ४०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे याचा चांगलाच फटका आंबा व्यापाऱ्यांना बसला असल्याचे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील आंबा व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली