राज्य सरकारच्या नवीन पीकविमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळल्यानं शेतकऱ्यांचा संताप
राज्य सरकारने नवीन पीकविमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळण्यात आल्याचा आरोप करत हा घटक पुन्हा पीकविमा योजनेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीतील शेतकरी या रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील गांधी चमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत ही रॅली काढण्यात आली.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पीकविमा योजनेत नसल्यास एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. गेल्यावर्षीचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं. विहीरींचं थकलेलं अनुदान देण्यात यावं.अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. जालन्यातील शेतकऱ्यांना सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवाल, तर मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.