कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाला ही संधी देण्यात आली आहे. गोकुळ अध्यक्ष निवडीनंतर गोकुळच्या कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला.
फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि गोकुळच्या पुढील काळातील धोरणांसाठी ही अध्यक्ष निवड महत्त्वाची मानली जात आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.